मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात मराठी कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णु वामन शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते, यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
आमच्या शाळेत मराठी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुले महाराष्ट्रीयन वेशभूषेत सजली होती. या कार्यक्रमासाठी सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी मराठी गीते सादर करून समारंभात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
